रेल्व चेकपोस्टवर गोळीबार: दोन सहकारी जखमी
श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिह्यातील काकापोरा येथे सोमवारी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास दहशतवाद्यांनी गोळीबार केला. मध्य रेल्वे पोलीस दलाच्या चेकपोस्टवर हा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात रेल्वे सुरक्षा विभागाचे एक वरिष्ठ अधिकारी हुतात्मा झाले. तसेच अन्य दोघे सहकारी जखमी झाले. दहशतवाद्यांनी आरपीएफच्या चौकीवर हल्ला करून अंदाधुंद गोळीबार केला. जखमी सुरक्षा कर्मचाऱयांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दहशतवाद्यांच्या शोधासाठी सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला. मात्र, रात्री उशिरापर्यंत गोळीबार करणाऱयांचा शोध लागू शकला नव्हता. हल्ला केल्यानंतर दहशतवादी तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले. सुरक्षा दल आणि स्थानिक पोलिसांनी दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू केली आहे. एप्रिल महिन्यात दहशतवादी हल्ला झालेली ही नववी मोठी घटना आहे.
हरियाणाचा जवान अनंतनागमध्ये हुतात्मा
जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये शनिवारी मध्यरात्री दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत हरियाणातील सिरसा येथील बहाउद्दीन गावातील एक जवान हुतात्मा झाला होता. कौटुंबिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निशान सिंग (27) हा 2013 मध्ये सैन्यात दाखल झाला होता. अलीकडेच 18 फेब्रुवारीला त्यांचा विवाह झाला होता. पंधरा दिवसांपूर्वी तो सुटी संपवून तो अनंतनाग येथे सेवेत दाखल झाला होता.