पुलवामा / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये मंगळवारी रात्रीपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. पुलवामाच्या राजपुरा भागात सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. ठार झालेल्या दहशतवाद्याची ओळख पटली असल्याचे काश्मीर पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या चकमकीनंतर बुधवारी दिवसभर परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच पोलीस आणि लष्कराने संयुक्तरित्या व्यापक शोधमोहीमही हाती घेतली होती.