ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यास सुरक्षा दलाला यश आले. त्यावेळी घाबरलेल्या दहशतवाद्याच्या साथीदाराने सुरक्षा दलाकडे आत्मसमर्पण केले.
जम्मू पोलीस आणि सीआरपीएफच्या एका पथकाने पुलवामा जिल्ह्यातील त्रालच्या नूरपोरा भागात सोमवारी संध्याकाळी शोधमोहीम हाती घेतली होती. शोधमोहीमेदरम्यान एका घरात लपून बसलेल्या अतिरेक्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. या गोळीबाराला भारतीय जवान आणि पोलिसांनी चोख प्रत्युत्तर दिले.
या गोळीबारात एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. दहशतवाद्याच्या मृत्यूनंतर घाबरलेल्या त्याच्या साथीदाराने भारतीय जवानांकडे आत्मसमर्पण केले.