ऑनलाईन टीम / श्रीनगर :
दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील हाकरीपोरा परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये आज चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दल आणि काश्मीर पोलिसांना यश आले. या परिसरात अद्याप शोधमोहीम सुरू आहे.
पुलवामाच्या हाकरीपोरा परिसरात दोन ते तीनकाही दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानुसार लष्काराची 50 आरआर, एसओजी आणि सीआरपीएफच्या एका संयुक्त पथकाने शोधमोहीम सुरू केली.शोधमोहिमेदरम्यान दहशतवाद्यांकडून झालेल्या गोळीबाराला सुरक्षा दलाच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. या कारवाईत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आले.
दरम्यान, आज शोपियां जिल्ह्यातील मेलहुरा परिसरातही दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले.