ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथील बंडजू भागात आज पहाटे दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सोलापूर जिल्ह्यातील पानगांवचे सीआरपीएफ जवान सुनील काळे शहीद झाले.
पुलवामा येथील बंडजू भागात काही दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानुसार सुरक्षा दलाने शोधमोहीम हाती घेतली. दरम्यान, बंडजू भागात सुरक्षा दलाने दहशतवादी लपलेल्या ठिकाणाला घेराव घातला. यावेळी दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबाराला काळे यांनी चोख प्रत्युत्तर दिले. आज पहाटे 4.30 वाजता काळे यांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. या कारवाईत काळे यांना वीरमरण आले.