पुलाची शिरोली / वार्ताहर
पुलाची शिरोलीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असुन हॅट्रीक झाली आहे. सध्या गावात ३०० इतकी कोरोना रुग्णांची संख्या झाली आहे. मागील दहा दिवसांपूर्वी रुग्ण संख्या प्रचंड होती. ती सध्या कमी झाली असुन चढता आलेख खाली आला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने गावात सर्वे सुरू केला आहे. पाच दिवसांत झालेल्या सर्वे मध्ये दोन रूग्ण आढळले आहेत. शिरोली ग्रामपंचायत व शिरोली पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई सुरुच ठेवली आहे.