पुलाची शिरोली / वार्ताहर
पुलाची शिरोली येथील छ.शिवाजी नगर कमान ते यादववाडी या रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून संशोधन विकास अंतर्गत ३५.५७ लक्ष कामाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या सदस्या शौमिका अमल महाडिक यांचे शुभ हस्ते करण्यात आले. हा निधी जि.प.सदस्या शौमिका महाडिक यांच्या फंडातून मंजूर करण्यात आला आहे.
यावेळी प्रभागातील जेष्ठ मान्यवरांच्याही हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले. यावेळी बोलताना महाडिक म्हणाल्या, शिरोलीचा विकास हा सुज्ञ नागरिक व समर्थक यांच्या सहकार्याने व प्रेमाने आम्ही करू शकलो. भविष्यातही शिरोली गावाबरोबर मतदार संघाचा विकास करण्यास महाडिक कुटूंब कटीबद्ध आहे.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख व ग्रा.पं.सदस्य बाजीराव पाटील म्हणाले, शिरोली गावासाठी माजी आमदार अमल महाडिक व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी कोट्यवधी रुपयांची विकास कामे केली आहेत. तरी विरोधकांनी त्यांच्या कामाचे श्रेय घ्यायचे थांबवून जनतेची दिशाभूल करु नये. तसेच विकास कामांना येणकेण प्रकारे खो घालायचे काम बंद करण्याचा इशारा दिला.यावेळी वडगांव मार्केट कमिटी माजी सभापती सुरेश पाटील,ग्रा.पं.सदस्य पुष्पा पाटील,तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.