पुलाची शिरोली / वार्ताहर
इंगळीकर कॉलनी पुलाची शिरोली येथील चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने पळवून नेले. ही घटना बुधवारी घडली असून याबाबत श्रीमती वनिता दयानंद भालेराव यांनी शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शिरोली पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अल्पवयीन मुलीचे आई-वडील नसल्यामुळे ती लहान पणापासून तिची मामी भालेराव यांच्याकडेच रहात होती. मंगळवारी ती घरात एकटीच असताना अज्ञात व्यक्तीने तिला घरातून पळवून नेले आहे. फिर्यादी यांनी तिचा नातेवाईक व इतर ठिकाणी शोध घेतला . पण ती सापडली नसल्याने गुरुवारी शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार मिरका हे करत आहेत.