अल्लु अर्जुन अन् रश्मिका मंदानाचा बोल्ड लुक
दाक्षिणात्य सुपरस्टार ‘अल्लू अर्जुन’ सध्या स्वतःचा आगामी चित्रपट ‘पुष्पा ः द राइज’वरून चर्चेत आहे. या चित्रपटातील प्रत्येक दृश्याने कोटय़वधी प्रेक्षकांची ‘पुष्पा’ चित्रपटगृहात पाहण्यासाठीची उत्सुकता वाढविली आहे. निर्मात्यांकडून या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.
‘पुष्पा’च्या नव्या ट्रेलरची सुरुवात अल्लूच्या एंट्रीने होते. तसच रश्मिकाचा बोल्ड लुकही दिसून येतो. अल्लू अर्जुनसह चित्रपटातील अभिनेत्री रश्मिका मंदाना देखील ट्विटरवर ट्रेंडमध्ये आहे. निर्मात्यांनी चित्रपटाची नवी पोस्टर्सही प्रदर्शित केली असून यात अल्लूचा लुक खूपच वेगळा दिसून येतोय. नव्या पोस्टरमध्ये अभिनेता खूपच स्टायलिश दिसून येतोय. हा चित्रपट तेलगू भाषेत तयार करण्यात आला असून तो आता तमिळ, मल्याळी, कन्नड आणि हिंदी भाषेतही प्रदर्शित केला जाणार आहे.
‘पुष्पा द राइज’ हा चित्रपट 17 डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन के. सुकुमार यांनी केले आहे. तर मैथ्री मुव्ही मेकर्सकडून याची निर्मिती करण्यात आली आहे. चित्रपटात अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू एका गाण्यात दिसून येणार आहे. ट्रेल प्रदर्शित करण्यापूर्वी सामंथाची झलकही लोकांना दाखविण्यात आली आहे.