वार्ताहर / पुसेगाव
पुसेगाव येथे मुख्य राज्यमार्गावर पल्सर दुचाकीला ट्रकने पाठिमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात पूजा विशाल मोरे (वय 19) यांचा मृत्यू झाला तर पती विशाल मोरे जखमी झाल्याची फिर्याद लखन मोरे यांनी पोलीस ठाण्यात दिली.
पुसेगावमधून जाणाऱया राज्यमार्गावर सेवागिरी द्रोण पत्रावळी दुकानासमोर बुधवारी दुपारी 2 वाजता दुचाकी आणि ट्रकचा अपघात झाला. विशाल मोरे आणि पूजा मोरे (रा. आकाशवाणी झोपडपट्टी सातारा) हे पल्सर दुचाकीवरुन साताऱयाकडे निघाले होते. पाठिमागून येणाऱया ट्रकने (एम एच 11 एफ 4743) मोरे यांच्या दुचाकीला धडक दिली. सदर अपघातात पूजा मोरे यांच्या डोक्याला मार लागून त्यांचा मृत्यू झाला तर विशाल मोरे हे जखमी झाले. लखन मोरे यांनी ट्रकचालक आयुष भालदर (करंजेनाका, सातारा) यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली. घटनेचा अधिक तपास पो. ना. व्हि. एम. भोसले करत आहेत.
दरम्यान, पुसेगावच्या मुख्य बाजारपेठेच्या राज्यमार्गावर वाहने अस्ताव्यस्त लावली जात आहेत. नागरिकांना तसेच पादचाऱयांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या तीन वर्षांपासून पुसेगावात सम-विषम पार्किंग असावे, अशी मागणी करूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.