स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : वर्षभर देत होता चकवा
प्रतिनिधी/ सातारा
जून 2019 मध्ये पुसेसावळी (ता. खटाव) येथे दरोडा टाकून हॉटेल चालक महिलेस व तिच्या पतीस मारहाण करून 45 हजारांचे सोन्या चांदीचे दागिने व 80 हजार रुपयांची रोकड असा मुद्देमाल जबरीने धाक दाखवून चोरून नेल्याची घटना घडली होती. या गुन्हय़ातील इतर काही आरोपींना जेरबंद करुन त्यांच्यावर मोक्कांतर्गंत कारवाई करण्यात आली होती. त्याच गुन्हय़ातील एक आरोपी वर्षभर चकवा देत होता त्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने जेरबंद केले आहे.
या मोक्क्याच्या गुन्हय़ातील महत्वाचा आरोपी हा फडतरवाडी (नेर) परिसरात नातेवाईकांना भेटण्यास येणार असल्याची खबर पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना मिळाली. त्यांनी तातडीने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गुन्हेगारास अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार दि. 29 रोजी स्थानिक गुन्हेचे पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जऱहाड व त्यांचे पथक औंध परिसरामध्ये पेट्रोलिंग करत होते. या दरोडय़ातील आरोपी याच परिसरात येणार असल्याची पक्की खबर होती. त्यामुळे तपास पथकातील अधिकाऱयांसह कर्मचाऱयांनी वेषांतर करुन सापळा रचला होता. गुराखी व शेतकऱयांच्या वेशात वेशांतर करून नेर तलाव परिसरामध्ये तपास पथक दबा धरुन बसले असताना दरोडय़ातील महत्वाचा आरोपी हा परिसरात आला असता त्याला पथकाने शिताफीने व चपळाईने ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारपूस केली असता सदर गुन्हय़ाबाबत माहिती त्यांनी पथकाला दिली असून त्यास औंध पोलीस ठाणे गुरनं 74/2019 भा.द.वि.क 395, 511, सह सह महाराष्ट्र संघटित गुन्हेगारीतील गुन्हय़ाच्या पुढील तपासकामी औंध पोलीस ठाणेकडे वर्ग केले आहे.
या कारवाईत जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अपर जिल्हा पोलीस अधिक्षक धीरज पाटील व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जऱहाड, सहाय्यक फौजदार उत्तम दबडे, ज्योतीराम बर्गे, हवालदार तानाजी माने, विजय कांबळे, नितीन गोगावले, रविंद्र वाघमारे, अजित कणे, अर्जुन शिरतोडे व चालक विजय सावंत, संजय जाधव यांनी कारवाईमध्ये सहभाग घेतला. वरिष्ठांनी या कारवाईबद्दल तपास पथकातील सर्वांचे अभिनंदन केले आहे.