पूजा हेगडे… दाक्षिणात्य तसंच हिंदी चित्रपटसृष्टीत नाव कमावलेली ही अभिनेत्री. पूजा वयाच्या तिशीतही खूप आकर्षक दिसते. अभिनयाच्या क्षेत्रात असल्यामुळे पूजाला फिटनेसकडे सतत लक्ष द्यावं लागतं. पूजाचं फिटनेस रूटीन आपणही जाणून घेऊ.
पूजा नियमितपणे जीमला जाते. व्यायाम केल्याशिवाय तिला चैनच पडत नाही. ती दररोज एरियल योगा, पिलेट्स आणि क्रॉसफिट ट्रेनिंग करते. यासोबतच ती पुशअप्स, बेंचप्रेस, पुशप्रेस, चिनअप, डेडलिफ्ट, ट्रायसेप पुशडाउन, सिंगल आर्म रो, बेंट ओव्हर, श्रग आणि वेटेड स्वॉट्स यासारखे व्यायामप्रकार करून स्वतःला फिट ठेवते.
पूजा व्यायाम करतानाचे व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. ती व्हील पोझ म्हणजे चक्रासन करते. या आसनामुळे वजन झपाटय़ाने कमी होतं. विशेषकरून साठलेली अतिरिक्त चरबी घटू लागते. या व्यायामामुळे शरीर लवचिक होऊ लागतं. त्वचेवर चमक येते. मध्यंतरी तिने बो पोझचा व्हिडिओही पोस्ट केला होता. भरपूर योगा केल्यानंतर खूप घाम आला असला तरी समाधान वाटत असल्याचं तिने नमूद केलं होतं. पूजाच्या या फिटनेस रूटिनमधून तुम्हीही प्रेरणा घेऊ शकता. योगा तसंच अन्य व्यायामप्रकारांमुळे तंदुरूस्त राहू शकता. विशेषकरून तिशीनंतर फिट रहाण्यासाठी पूजाकडून फिटनेसचे धडे घेता येतील.