प्रतिनिधी / कुरुंदवाड
पूरग्रस्तांसाठी पक्की घरे बांधून देऊन फेडरल बँकेने सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून या गावांना पुन्हा उभे राहण्यासाठी जो आधार दिला आहे. याचा आदर्श शिरोळ मॉडेल म्हणून इतरांनी घेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केलेया ते शिरोळ तालुक्यातील बस्तवाड राजपुरवाडी येथे फेडरल बँकेच्या वतीने पुरग्रस्तांसाठी बांधण्यात आलेल्या घरांच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल जिल्हा परिषद सदस्य परवीन दादे पाशा पटेल प्रवीण माने प. स. सभापती मीनाज जमादार रूपाली मगदूम गटविकास अधिकारी शंकर कवितके डीएचओ साळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
2019 च्या म्हपुराचा सर्वाधिक फटका शिरोळ तालुक्याला बसला होता यामध्ये तालक्यातील बस्तवाड राजपुरवाडी येथील घरांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते याची दखल घेत फेडरल बँकेने आपल्या सी एस आर फडातून या दोन्ही गावातील पुरग्रस्तांसाठी 80 पक्के घरे त्याचबरोबर अत्याधुनिक सुविधेसह शाळेच्या आठ खोल्या शुद्ध पेयजल प्रकल्प घंटागाडी आदी सुमारे 3 कोटी सहा लाख रुपये च्या विविध उपक्रमाचा लोकार्पण सोहळा मंत्री यद्रावकर यांच्या हस्ते पार पडला यावेळी बँकेचे विभागीय व्यवस्थापक अजित देशपांडे उपसभापती मल्लू खोत बस्तवाड सरपंच प्रज्ञा चव्हाण राजापूर वाडी सरपंच विजय एक्समबे उपसरपंच शैलजा गोते उपस्थित होते.
मंत्री यड्रावकर म्हणाले 2019 च्या महापुरात अचानक पाणी आल्याने स्थलांतर योग्य रीतीने होऊ शकले नाही याला त्यावेळची शासकीय यंत्रणा कारणीभूत होती मात्र संभव महापुराचा दक्षता घेण्यासाठी राज्य शासन सतर्क आहे. मागील वर्षी प्रमाणे महापूर येऊ नये यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत असे सांगून ते म्हणाले फेडरल बँकेने येथे केलेले काम गौरवास्पद आहे. राज्यातील अन्य बँकेने ही आपल्या सीएसआर फंडचा सामाजिक कार्यासाठी उपयोग करून फेडरल बँकेने अनुकरण करावे कारण शासन सर्वत्र पोहचू शकत नाही या करिता अश्या संस्थेने पुढे यावे. फेडरल बँकेने बस्तवाड आणि राजापूरवाडी या पूरग्रस्त गावांचा सर्वांगीण विकास करण्याचे ध्येय हाती घेतले आहे. केवळ अन्नधान्य न पुरवठा घरे शाळा शुद्ध पेयजल प्रकल्प घनकचरा व्यवस्थापन आधी सुविधा देणे म्हणजे गावे दत्तक घेतल्या सारखाच प्रकार आहे. फेडरल बँकेने शाळेसाठी भौतिक सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्या तरी येथील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्याची येथे शिक्षकांची जबाबदारी आहे. असे सांगून त्यांनी बॅंकेने आता आणखी एक पाऊल पुढे जाऊन या पूरग्रस्त गावातील तरुणांना उद्योजक बनविण्यासाठी अल्प दरात कर्ज उपलब्ध करून द्यावे असे सूचित केली.
यावेळी जिप मुख्य कार्यकारी अमन मित्तल यांनी फेडरल बँकेच्या कार्याबद्दल गौरव उद्गार व्यक्त करत संभाव्य पुराच्या बाबतीत विविध सूचना केल्या. तसेच महापुरा पाठोपाठ covid-19 चा सामना येथील लोकांनी चांगल्या प्रकारे केला आहे. आता येथे कोणाचा एकही रुग्ण नाही त्यामुळे ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्याची जबाबदारी आणि निर्णय स्थानिक शालेय शिक्षण समितीने घ्यावा व विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळावे अशा सूचना केल्या.
यावेळी मंत्री यड्रावकर अमन मित्तल व अजित देशपांडे यांच्या हस्ते लाभार्थीना घरांच्या किल्ल्या तसेच ग्रामपंचयतील पेयजल घंटागाडी हस्तांतरित करण्यात आले. स्वागत आणि प्रास्ताविक अजित देशपांडे यांनी केले यावेळी प्रज्ञा चव्हाण विजय एकसंबे मिनाज जमादार आदींनी मनोगत व्यक्त केले. बस्तवाड आणि राजापूर वाडी घरे बांधणारे इंजिनीयर कुलकर्णी दांपत्य यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
तुमच्या पाठीशी गणेशाचा आशीर्वाद
मंत्री यड्रावकर यावेळी बोलताना म्हणाले की फेडरल बँकेने चांगले काम केलेले आहे. मात्र गणेश बँकेच्या आशीर्वादामुळेच फेडरल बँक जिल्ह्यात मोठी झाले आहे हे तुम्हाला विसरुन चालणार नाही त्यामुळे तुमची या परिसराची सामाजिक बांधिलकीची जबाबदारी वाढली आहे. मंत्री यड्रावकर म्हणाले आपला तालुका कोरोना मुक्त झाला आहे. आता महापुराच्या संकटावर ही मात शासनाच्या आणि सर्वांच्या सहकार्याने मात करूया.