नवे संकेतस्थळ सादर
भारतात कोरोना संसर्गुमळे 31 मेपर्यंत टाळेबंदी वाढविण्यात आली आहे. नव्या टाळेबंदीत सरकारने अनेक प्रकारची बंधने शिथिल केली आहेत. केंद्र सरकारने नवे संकेतस्थळ सादर करून विविध राज्यांमध्ये प्रवास करण्यासाठी कोविड ई-परवान्यासाठी अर्ज करण्याकरता व्यासपीठ उपलब्ध केले आहे.
नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरने (एनआयसी) http://serviceonline.gov.in/epass वेब पेज विकसित केले आहे. सद्यस्थितीत या संकेतस्थळावर 17 राज्यांच्या ई-परवान्यासाठी अर्ज केला जाऊ शकतो. प्रवासासाठी काही निश्चित वर्गवारीच्या अंतर्गतच ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. या वर्गवारीत विद्यार्थी, अत्यावश्यक सेवा प्रदाते, पर्यटक, भाविक, आपत्कालीन तसेच वैद्यकीय कारणासाठीचा प्रवास आणि विवाह यांचा समावेश आहे.
वेबपेजवरील माहितीनुसार एखादा व्यक्ती किंवा समूह या सेवेचा वापर करून प्रवासासाठी अनुमती मागू शकतो. ई-पाससाठी सर्व आवश्यक दस्तऐवजांची स्कॅन प्रत जमा करावी लागणार आहे. याचबरोबर ओटीपी पडताळणीसाठी एक सक्रीय मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. वेब पेजवर अर्ज केल्यावर संबंधित व्यक्तीला एक संदर्भ क्रमांक मिळतो. पासवर अर्जदाराचे नाव, पत्ता, कालावधी आणि क्यूआर कोड असणार आहे.