वार्ताहर / यड्राव
पूर्ववैमनस्यातून शहापूर तालुका हातकणंगले येथील आर के नगर एकता कॉलनीमध्ये दुचाकी मोटरसायकल पेटवून नुकसान केल्याप्रकरणी अशपाक राजनांवर वर वय वर्षे 23 यांनी शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, या प्रकरणी अमोल विलास काजवे वय वर्षे 28 व अनिल चंद्रकांत काजवे वय वर्ष बत्तीस दोघे राहणार असरा नगर इचलकरंजी यांना अटक करण्यात आली आहे.
दिनांक 18 रोजी रात्री एकच्या सुमारास फिर्यादी अशपाक राजनावर यांचे दारात लावलेली टीव्हीएस एक्सल मोटरसायकल संशयित अनिल काजवे व अमोल काजवे यांनी हातात असलेल्या बाटलीतील कसलातरी ज्वलनशील पदार्थ गाडीवर टाकून काडेपेटीने आग लावून निघून गेले यात मोटरसायकलचे अंदाजे पंधरा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.