बोरगांव
नुकताच झालेल्या भौतिकशास्त्र या विषयावर आंतरराष्ट्रीय ऑनलाईन सेमिनारमध्ये बोरगाव येथील पूर्वा निकम हिने तिसरा क्रमांक मिळविल्याने परिसरात तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. पूर्वा ही कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात पीएचडी करते. भौतिक शास्त्रावरही संशोधन करीत आहे. नुकतेच पंजाब येथील लव्हली युनिव्हर्सिटी यांच्यामार्फत ऑनलाईन सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भारतासह 33 देशातील विद्यार्थी सहभागी झाले होते. या ऑनलाईन सेमिनारमध्ये पूर्वा निकम हिने तिसरा क्रमांक पटकाविला. तिच्या या कामगिरीमुळे सर्वत्र कौतुक होत आहे .प्राध्यापक बी. एस. पवार, डॉ. एस. डी. पाटील व डॉ. मानसिंग टाकले यांच्यासह आई-वडील व परिवाराचे सहकार्य मिळाल्याचे पूर्वा निकम यांनी सांगितले.