वार्ताहर/ सांबरा
तालुक्याच्या पूर्वभागात मंगळवारी ग्राम पंचायतीसाठी चुरशीने मतदान झाले. बसरीकट्टी येथे सर्वाधिक 90 टक्के मतदान झाले आहे. पूर्व भागातील निलजी, बसरीकट्टी, मुतगा, सांबरा, बाळेकुंद्री खुर्द आदी ठिकाणी सकाळपासूनच मतदारांची गर्दी दिसून आली. पुरुषाबरोबरच महिला मतदारांची संख्याही लक्षणीय होती. दुपारनंतर गर्दी कमी होती. पुन्हा चार नंतर मतदारांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले. सर्वच मतदान केंद्रावर शासनाचे नियम पाळत मतदारांची शांततेत मतदानाचा हक्क बजावला.
बसरीकट्टीत सर्वाधिक 90 टक्के मतदान
बसरीकट्टी गावचा मास्तमर्डी ग्राम पंचायतीत समावेश असून येथे दोन वॉर्ड आहेत. वॉर्ड क्रमांक 4 मध्ये 1033 मतदार पैकी 938 मतदारांनी हक्क बजावला. वॉर्ड क्रमांक 5 मध्ये 1062 पैकी 963 मतदान झाले.
सांबरा येथे 73 टक्के मतदान
येथे एकूण 9 वॉर्ड असून 33 जागांसाठी 73 मतदान झाले आहे. वॉर्ड क्रमांक 1 मध्ये 824 पैकी 582, 2 मध्ये 1055 पैकी 740, 3 मध्ये 1144 पैकी 875, 4 मध्ये 1111 पैकी 839, 5 मध्ये 462 पैकी 369, 6 मध्ये 692 पैकी 457, 7 मध्ये 863 पैकी 572, 8 मध्ये 719 पैकी 577 व वॉर्ड क्रमांक 9 मध्ये 397 पैकी 302 मतदान झाले आहे. एकूण 7267 मतदारांपैकी 5313 मतदारांची मतदानाचा हक्क बजावला असून 73 टक्के मतदान झाले आहे.
मुतगा येथे 75 टक्के
येथे एकूण 6619 पैकी 5016 मतदान झाले असून चुरशीने मतदान झाले आहे. वॉर्ड क्रमांक 1 मध्ये 1000 पैकी 899, 2 मध्ये 537 पैकी 470, 3 मध्ये 883 पैकी 719, 4 मध्ये 514 पैकी 421, 5 मध्ये 1225 पैकी 983, 6 मध्ये 1890 पैकी 1033 व वॉर्ड क्रमांक 7 मध्ये 570 पैकी 491 मतदान झाले आहे.
निलजीत 87.16 टक्के मतदान
येथे वॉर्ड क्रमांक 1 मध्ये 523 पैकी 456, 2 मध्ये 571 पैकी 516 व वॉर्ड क्रमांक 3 मध्ये 1640 पैकी 1411 मतदान झाले आहे. निलजी ग्राम पंचायतीत शिंदोळी गावचाही समावेश आहे.