ऑनलाईन टीम / लडाख :
पूर्व लडाखमध्ये तैनात असलेले चीनचे 90 टक्के सैन्य कडाक्याच्या थंडीमुळे पीपल्स लिबरेशन आर्मीने माघारी बोलावले आहे. पूर्व लडाखमध्ये चीनने जवळपास 50 हजार सैन्य तैनात केले होते. मात्र, हे सैन्य कडाक्याच्या थंडीचा सामना करण्यास असमर्थ ठरत होते. त्यामुळे यातील 90 टक्के सैन्य चीनने माघारी बोलावले. या सैनिकांची जागा घेण्यासाठी दुसरे सैन्य पाठविण्यात आले आहेत.
कडाक्याच्या थंडीमुळे पँगाँग लेक क्षेत्रात तैनात असलेल्या चिनी सैनिकांची हालचाल प्रतिबंधित झाली होती. रोज सैनिकांची जागा बदण्यात येत होती. मागील वर्षी एप्रिल-मे महिन्यात हे सैन्य येथे तैनात करण्यात आले होते. थंडीचा चिनी सैन्यांवर मोठा परिणाम झाला आहे.
दरम्यान, भारतीय सैन्यही या उंच भागात दोन वर्षासाठी आपल्या सैनिकांना तैनात करते. दरवषी जवळपास 40-50 टक्के सैनिक फिरवले जातात. या परिस्थितीत आयटीबीपी कर्मचाऱ्यांचा कार्यकाळ कधीकधी दोन वर्षांपेक्षा जास्त असतो.