भारतात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने चाचण्यांचे प्रमाण वाढविणे आवश्यक ठरले आहे. परंतु काही प्रमाणात भारतात रुग्णसंख्या वाढीचा वेग मंदावला आहे. तरीही आता एकत्रिक नमुन्यांच्या (पूल्ड सॅम्पल्स) स्क्रीनिंगद्वारे चाचण्यांना वेग दिला जाऊ शकतो. पूल टेस्टिंगमध्ये एकाचवेळी पाच नमुन्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
एकत्रित नमुना चाचणी अल्गोरिदममध्ये प्रतिरुप नमुन्यांचे पीसीआर स्क्रीनिंग सामील असते. हे प्रतिरुप अनेक संशयितांकडून प्राप्त केले जातात. पूल टेस्टिंगचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास वैयक्तिक चाचणी केली जाते. एक निगेटिव्ह एकत्रित नमुन्यान सर्व संबंधित व्यक्तींना निगेटिव्ह मानले जाते. यात बहुतांश पूल निगेटिव्ह आढळल्यास खर्च वाचविण्यास चांगलीच मदत होणार आहे.
देशात चाचणी वाढविण्याच्या प्रयत्नांतर्गत कोरोना विषाणूच्या आण्विक चाचणीच्या (मोलेक्यूलर टेस्टिंग) उद्देशाने एकत्रित नमुन्यांच्या (पूल्ड सॅम्पल्स) वापराच्या शक्यतेसंबंधी सोमवारी सूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. भारतात कोविड-19 च्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रयोगशाळांकडून चाचणींचे प्रमाण वाढविणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे आयसीएमआरने म्हटले आहे.
आरटी-पीसीआर तपासणीसाठी नमुन्यांचे एकत्रिकरण करण्याची शिफारस केवळ कोरोनाचा फैलाव अत्यंत कमी असलेल्या क्षेत्रांसाठीच करण्यात येत असल्याचे आयसीएमआरने स्पष्ट केले आहे. निगेटिव्ह पूलमध्ये सर्व वैयक्तिक नमुन्यांना निगेटिव्ह मानले जाणार आहे.