ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
स्टेडियमसारख्या विशाल आकाराचा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने वेगाने येत आहे. 24 जुलै रोजी हा लघुग्रह पृथ्वीच्या जवळून जाणार असून, नासाचे शास्त्रज्ञ त्यावर बारीक लक्ष्य ठेवून आहेत.
नासाच्या अहवालानुसार, हा महाकाय लघुग्रह 8 किलोमीटर प्रति सेकंद म्हणजेच ताशी सुमारे 28,800 किलोमीटर वेगाने पृथ्वीजवळ येत आहे. 2008 जीओ 20 असे या लघुग्रहाचे नाव आहे. 24 जुलै रोजी तो पृथ्वीजवळून जाणार आहे. नियर अर्थ ऑब्जेक्ट प्रकारामध्ये मोडणारा म्हणजेच पृथ्वीजवळून जाणारा हा लघुग्रह 20 मीटर रुंद आहे. पृथ्वी आणि चंद्र दरम्यानच्या एकूण अंतराच्या आठपट म्हणजे 28,70,857,607 किमी अंतरावरून तो दिसेल.
हा लघुग्रह अपोलो म्हणजेच सर्वात घातक प्रकारातील असून, त्यावर नासाची बारीक नजर आहे.