प्रतिनिधी /बेळगाव
सुपर डान्सर या रिऍलिटी शोमध्ये उपविजेता ठरलेल्या वडगावच्या पृथीराज कोंगारीचे याचा सत्कार जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी केला. जिल्हाधिकारी कार्यालयात त्याचा हा सत्कार कार्यक्रम पार पडला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, महसूल अधिकारी एस. एम. परगी आदी उपस्थित होते. पृथ्वीराजने नृत्याच्या जोरावर सुपर डान्स स्पर्धेमध्ये उपविजेतेपद मिळविले आणि बेळगावचे नाव संपूर्ण देशात केले. याबद्दल त्याचा सत्कार करून त्याला शुभेच्छा दिल्या. यावेळी त्याचे गुरू किरण कांबळे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी यल्लाप्पा कोलकार, रवी कांबळे, राजू कोंगारीचे, संदीप कोलकार, विजित हिरेमठ आदी उपस्थित होते.