मानुषी छिल्लर अन् अक्षय कुमारचा चित्रपट
पृथ्वीराज या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट सम्राट पृथ्वीराज चौहान यांचे जीवन आणि त्यांच्या शौर्याची कहाणी दर्शविणारा आहे. चित्रपटात अक्षय कुमारने पृथ्वीराज चौहान यांची भूमिका साकारली आहे. अक्षयसाब्sात संजय दत्त, सोनू सूद, मानव विज आणि आशुतोष राणा यात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटातून माजी विश्वसुंदरी मानुषी छिल्लर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली असून त्यांनीच दिग्दर्शनाची जबाबदारी पेलली आहे.
मानुषीने यात राजकुमारी संयोगिता ही व्यक्तिरेखा साकारली आहे. तर मानव विज यांनी भारतावर आक्रमण करणाऱया मोहम्मद घोरीची भूमिका साकारली आहे. यशराज प्रॉडक्शन्सच्या बॅनर अंतर्गत निर्मित हा चित्रपट 3 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. ट्रेलरमध्ये सर्वाधिक लक्ष मोहम्मद घोरीच्या भूमिकेत मानव विजने वेधून घेतले आहे.