चित्रपटाचा टीजर आउट- मानुषी छिल्लर अन् सोनू सूद महत्त्वाच्या भूमिकेत
यशराज फिल्म्सने महान योद्धा पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित स्वतःचा आगामी चित्रपट ‘पृथ्वीराज’चा पहिला टीजर प्रदर्शित केल आहे. हा चित्रपट सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित असून अक्षय कुमार या योद्धय़ाच्या भूमिकेत दिसून येणार आहेत. चित्रपटात सोनू सूद देखील दिसणार आहे. तर चित्रपटाद्वारे माजी विश्वसुंदरी मानुषी छिल्लर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
हा चित्रपट 21 जानेवारी रोजी चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे. टीजरमध्ये अक्षय कुमार तसेच संजय दत्त देखील दिसून येतो. तर संयोगिता ही भूमिका साकारणाऱया मानुषीची झलकही दिसून येते. चित्रपटात अक्षय, मानुषी, सोनू आणि संजय दत्तसोबत आशुतोष राणा आणि सात्री तंवर देखील मुख्य भूमिका साकारत आहेत.
पृथ्वीराजचा टीजर चित्रपटाचा आत्मा दर्शवितो, महान योद्धा सम्राट पृथ्वीराज चौहान यांचे शौर्य आणि त्यांच्या जीवनाला आम्ही आदरांजली वाहू इच्छितो. पृथ्वीराज यांनी स्वतःचा देश आणि मूल्यांसाठी स्वतःचे आयुष्य वेचल होते. ते सर्वात प्रामाणिक राजांपैकी एक होते. या पराक्रमी योद्धय़ाला आम्ही देत असलेली मानवंदना जगभरातील भारतीय स्वीकारतील अशी अपेक्षा असल्याचे अक्षय कुमारने म्हटले आहे.