वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय अ संघ न्यूझीलंडच्या दौऱयावर जाणार आहे. दरम्यान मुंबईचा नवोदित युवा फलंदाज पृथ्वी शॉ याला खांदा दुखापतीची समस्या अधिक भेडसावत असल्याने त्याने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शॉ याच्या न्यूझीलंड दौऱयाबाबत अनिश्चिता जाणवत आहे.
पृथ्वी शॉचा भारत अ संघात समावेश करण्यात आला आहे. दरम्यान रणजी क्रिकेट स्पर्धेतील मुंबई आणि कर्नाटक यांच्यातील सामन्यात खेळाच्या पहिल्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना शॉ च्या डाव्या खांद्याला दुखापत झाली. या दुखापतीमुळे तो मैदानात पुन्हा खेळू शकला नाही. त्यानंतर या दुखापतीवर वैद्यकीय इलाज करवून घेण्यासाठी पृथ्वीने तातडीने बेंगळूरला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल होण्याचे ठरविले. भारत अ संघ 10 जानेवारीला न्यूझीलंडला प्रयाण करणार आहे.