राज्यात कॅटरिंग व्यवसाय भरभराटीस
प्रतिनिधी / पणजी
राज्यातील खाद्यान्न म्हणजेच पॅटरिंग उद्योगही आता प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या स्पॅनरखाली आला असून मंडळाने त्यांनाही प्रमाणपत्र सक्तीचे केले आहे. मंडळाच्या 15 डिसेंबर रोजी झालेल्या संचालक मंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
विविध लग्नसोहळे, वाढदिवस, पाटर्य़ा यामुळे गेल्या काही वर्षांपासून राज्यात पॅटरिंग उद्योग बऱयापैकी बहरला, भरभराटीस आला आहे. अशा पाटर्य़ांसाठी पूर्वी घरीच खाण जेवण बनविले जायचे. परंतु हल्लीच्या काळात जेवण बनविणारे कामगार मिळत नसल्यामुळे ती जबाबदारी थेट पॅटरिंग कंत्राटदारावर सोपविली जाते. आता तर ती एक परंपराच बनून गेली आहे. ही वाढती मागणी पाहता अनेकजण या धंद्यात उतरले आहेत. त्यात वैयक्तिक आस्थापनापासून क्लब, महिलामंडळे यांचाही समावेश आहे.
काही पॅटरर्स तर एवढे प्रस्थापित बनले आहेत की, त्यांच्याकडे किमान सहा महिने ते वर्षभर पूर्वीच आगाऊ नोंदणी करावी लागते. त्यावरून या व्यवसायाची व्याप्ती लक्षात येते. मात्र हल्लीच्या काळात अनेक पॅटरर्स लोकांना पुरविलेल्या खाद्य पदार्थांचा दर्जा राखण्यात हलगर्जीपणा करताना आढळून आले होते. त्यातून अनेकांना अन्नबाधा होण्यासारखे प्रकारही उघडकीस आले होते. काही प्रकरणात पोलीस स्थानकापर्यंत तक्रारी पोहोचल्या होत्या, तर काही ठिकाणी सामोपचाराने प्रकरण मिटविण्यात आले होते.
या सर्वांची दखल घेत आता गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्यातील सर्व पॅटरर्सना नोंदणी सक्तीची केली आहे. मंडळाच्या प्रमाणपत्राशिवाय यापुढे त्यांना पॅटरिंग करता येणार नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करत असल्याचे सिद्ध करण्यासाठीच हे आगाऊ प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात आले आहे. मंडळाच्या तांत्रिक विभागाचे सदस्य राज्यातील प्रत्येक पॅटरिंग आस्थापनाचे सखोल परीक्षण करतील. एखादे आस्थापन पात्र ठरण्यासाठी निर्धारित चाचणी प्रक्रियेत 30 गूण प्राप्त करावे लागतील. त्यानंतरच प्रमाणपत्र देण्यात येईल, अशी माहिती मंडळातील सुत्रांनी दिली.