वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्रीय क्रीडामंत्री अनुरा ठाकूर, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया आणि कायदामंत्री किरण रिजिजू यांनी मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडिअमपासून अकबर मार्गापर्यंत सायल चालवून ‘पॅडल फॉर हेल्थ’ मोहिमेची सुरुवात केली ओह. ही मोहीम स्वातंत्र्याच्या महोत्सवाच्या अंतर्गत आयोजित करण्यात आली होती.
75 व्या स्वातंत्र्यानिमित्त केंद्र सरकार स्वातंत्र्याचा महोत्सव साजरा करत आहे. याच अंतर्गत क्रीडा मंत्रालयाने शुक्रवारी इंडिया फ्रीडम रन 2.0 चे आयोजन केले होते. ‘आयुष्मान भारत योजने’चे समर्थन करणे आणि ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा’ला एका सार्वजनिक जागृतीच्या स्वरुपात साजरा करण्यासाठी अनुराग ठाकूर आणि किरण रिजिजू यांच्यासोबत ‘पॅडल फॉर हेलथ’ मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम देशात सायकलला चालना देण्यास आणि भारताला तंदुरुस्त ठेवण्यास मदत करणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी ट्विट करत म्हटले आहे.
फिट इंडिया रन 2.0 मोहीम शुक्रवारी देशातील 75 ठिकाणी आयोजित करण्यात आली. फिट इंडिया फ्रीडम रन अंतर्गत 2 ऑक्टोबरपर्यंत देशातील 744 जिल्हे, प्रत्येक जिल्हय़ातील 75 गावे आणि 30 हजार शैक्षणिक संस्थांमध्ये आयोजित करण्यात येईल. फिट इंडिया फ्रीडम रनच्या माध्यमातून 7.50 कोटींहून अधिक युवा आणि नागरिक यात सामील होण्याची शक्यता आहे.