ऑनलाईन टीम / टोकियो :
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये बॅडमिंटन स्पर्धेत आज नोएडाचे जिल्हाधिकारी सुहास यथिराज यांनी रौप्य पदकाची कमाई केली. सुहास यांनी पहिल्या सामन्यात जेन निकलस पॉट याला 21-9, 21-3 सरळ सेटमध्ये हरविले. त्यानंतर पुढच्या सामन्यात इंडोनेशियाच्या हॅरी सुसांतो याला 21-6, 21-12 अशा फरकाने पराभूत केले. मात्र, शेवटच्या सामन्यात फ्रान्सच्या लुकास मझूरने सुहास यांना 15-21, 21-17, 21-15 असे पराभूत केले.