प्रतिनिधी/ बेळगाव
ताप आल्यावर साधारणपणे पॅरासिटामॉल औषध घेण्याची प्रवृत्ती नेहमीच दिसते. डॉक्टरांकडे जाण्याचे टाळत रुग्ण स्वत:च पॅरासिटामॉल गोळय़ा आणून आपल्यावर उपचार करू पाहतो. मात्र कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर सध्या पॅरासिटामॉलच्या गोळय़ांवर औषध नियंत्रण विभागाने निर्बंध घातले आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे रुग्णांना आता या गोळय़ा सहजासहजी उपलब्ध होत नाही.
कोरोनाच्या लक्षणामध्ये ताप येणे हे एक महत्त्वाचे लक्षण आहे. परंतु पॅरासिटामॉल घेतल्यानंतर ताप कमी होत असल्याने कोरोनाची चाचणी टाळली जाते. परंतु एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लक्षणे आढळली आणि त्याने पॅरासिटामॉल घेऊन चाचणी टाळली तरी त्या व्यक्तीमुळे इतरांना संसर्ग होऊ शकतो. असे प्रकार घडू लागल्याने औषध नियंत्रण विभागाने पॅरासिटामॉलवर निर्बंध घातले आहेत.
आता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय कोणालाही पॅरासिटामॉल उपलब्ध होत नसून औषध विपेत्यांना ही प्रिस्क्रिप्शन घेऊन येणाऱया रुग्णाचा तपशील द्यावयास सांगण्यात आले आहे.