वृत्तसंस्था/ अल एन
संयुक्त अरब अमिरातमध्ये सध्या सुरू असलेल्या 2021 च्या अल एन विश्व पॅरा नेमबाजी स्पर्धेत भारताची महिला पॅरा नेमबाज अवनी लेखराने रौप्यपदक पटकाविले. या स्पर्धेच्या पदकांच्या यादीत भारत तिसऱया स्थानावर आहे.
आर-2 महिलांच्या 10 मी. एअर रायफल एसएच नेमबाजी प्रकारात अवनी लेखराने 248.7 गुणांसह रौप्यपदक पटकाविले. या क्रीडाप्रकारात युक्रेनच्या इरिना स्किटनीकने 249 गुण नोंदवित सुवर्णपदक मिळविले. या स्पर्धेच्या पाचव्या दिवसाअखेर पदकतक्त्यामध्ये युक्रेनने 4 सुवर्ण, 4 रौप्य आणि 1 कास्य पदकांसह पहिले, यजमान संयुक्त अरब अमिरातने 3 सुवर्ण, 1 रौप्य पदकांसह दुसरे तर भारताने 1 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कास्यपदकांसह तिसरे स्थान घेतले आहे. या स्पर्धेत 24 देशांचे 120 स्पर्धक सहभागी झाले आहेत.