वृत्तसंस्था/ अल एन
येथे सुरू असलेल्या 2021 च्या विश्वचषक पॅरा नेमबाजी स्पर्धेत भारताच्या सिंघराजने सुवर्णपदक पटकाविले. भारताच्या नरवालला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
पुरूषांच्या पी-1 10 मी. एअर पिस्तुल एसएच 1 नेमबाजी प्रकारात 2019 साली सिडनीतील विश्व पॅरा नेमबाजी स्पर्धेत पदक मिळविणाऱया भारताच्या सिंघराजने 236.8 गुणासह सुवर्णपदक पटकाविले. सिंघराजने 2016 च्या रिओ ऑलिंपिक स्पर्धेत कास्यपदक मिळविणाऱया इब्ा्रागिमोव्हला 2.8 गुणांनी मागे टाकले. इब्रागिमोव्हने 234 गुण नोंदविले. या क्रीडा प्रकारात उझ्बेकच्या इब्राहिमोव्हने रौप्यपदक तर तुर्कीचा येमॅकने 214.4 गुणांसह कास्यपदक घेतले. भारताच्या मनिष नरवालला 194.3 गुणांसह चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले तर भारताचा राहुल जाखर आठव्या स्थानावर राहिला. आता या स्पर्धेच्या गुणतक्त्यात भारताने एक सुवर्ण आणि 1 कास्यपदकांसह तिसरे स्थान मिळविले असून युक्रेन तीन सुवर्ण, तीन रौप्य आणि एक कास्यपदकांसह पहिल्या तसेच यजमान संयुक्त अरब अमिरात दोन सुवर्णपदकांसह दुसऱया स्थानावर आहे. या स्पर्धेत महिलांच्या पी-2 10 मी. एअर पिस्तुल एसएच-1 नेमबाजी प्रकारात भारताच्या रूबिना फ्रान्सिसला आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले. या क्रीडाप्रकारात इराणच्या सारेह जेवानमर्डीने 237.7 गुणांसह विश्व विक्रमाची बरोबरी करत सुवर्णपदक पटकाविले.