प्रियकरासोबत महागडी अंगठी घालून केले प्रपोज
हॉलिवूड अभिनेत्री आणि उद्योजिका पॅरिस हिल्टनने स्वतःचा व्हेंचर कॅपिटलिस्ट प्रियकर कार्टर रियमसोबत अलिकडेच साखरपुडा केला आहे. दोघांनीही 13 फेब्रुवारी रोजी पॅरिसच्या 40 व्या जन्मदिनाच्या सोहळय़ादरम्यान स्वतःच्या नात्याला नवे स्वरुप दिले आहे. दोघेही यानिमित्त एका खासगी बेटावर होते. कार्टरने पॅरिसला अत्यंत महागडय़ा डायमंड रिंगसह प्रपोज केले हेते.
आता या रिंगची चर्चा सर्वत्र होत आहे. पॅरिसला तिचा प्रियकर कार्टरने अत्यंत सुंदर एमरल्ड कटयुक्त डायमंड रिंग घातली आहे. या रिंगची निर्मिती जीन डौस्सेटने केली आहे. जीन हा प्रख्यात प्रेंच ज्वेलरी आयकॉन लुइस कार्टियरचा पणतू आहे. पॅरिस हिल्टनच्या संकेतस्थळावर साखरपुडय़ाची छायाचित्रे प्रसारित करण्यात आली आहेत.
पॅरिस हिल्टनच्या एंगेजमेंट रिंगची किंमत 2 दशलक्ष डॉलर्स आहे. भारतीय चलनात याचे मूल्य सुमारे 14,51,08,600 रुपये आहे. कार्टरने पॅरिस हिल्टनच्या प्रेमापोटी स्वतःचा खिसा रिकामी करविला आहे. पॅरिसने स्वतःच्या युटय़ूब वाहिनीवर या अंगठीच्या संरचनेची चित्रफितही प्रसारित केली आहे.
पॅरिस हिल्टनने समाजमाध्यमांवर काही दिवसांपूर्वीच या नव्या नात्याची घोषणा केली होती. ‘माझे स्वप्न सत्य झाले आहे, मी माझ्या होणाऱया पतीवर अत्यंत प्रेम करते’’ असे पॅरिसने नमूद केले आहे. साखरपुडय़ाच्या दिवशी पॅरिस आणि कार्टरने मॅचिंग आउटफिट परिधान केले होते. पॅरिसने शिमरिंग व्हाइट रेट्रॉएट ड्रेस आणि क्राउन घातला होता. तर कार्टर क्रिस्प व्हाइट सूटमध्ये दिसून आला. कार्टरने पॅरिसला ट्रॉपिकल बेटावर प्रपोज केले आहे.
पॅरिस आणि कार्टर दोन वर्षांपासून परस्परांना डेट करत आहेत. माझ्या जीवनाचा पुढील टप्पा आणि अत्यंत सहकार्यात्मक जोडीदाराला आपलंसं करण्यासाठी उत्साही आहे. आमचे नाते समानतेचे असल्याचे पॅरिस म्हणाली.