वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना म्हणजेच कोविड19 च्या विषाणूने साऱया जगभर मोठय़ा प्रमाणात थैमान घातलेले आहे. यामध्ये जगातील सर्वच देशांमधील अर्थव्यवस्था प्रभावीत झाल्या आहेत. अशा कठीण प्रसंगातून सावरण्यासाठी विविध कंपन्या आपल्या ग्राहकांना विविध प्रकारचे संरक्षण कवच देण्याचा प्रयत्न करीत आहेत. काहीजण ऑनलाईन प्लॅटफार्म वापरुन सुविधा देत आहेत. सध्या देशातील प्रमुख पेमेंन्ट कंपनी असणारी पेटीएमने आता कोविडसाठी विमा संरक्षण देणार असल्याची घोषणा केली आहे.
कंपनीने केवळ 225 रुपयांच्या प्रीमियमवर विशेष कोविड 19 बेनिफिट इंशुरन्स पॉलिसी सादर केली आहे. यामध्ये जास्तीत जास्त दोन लाख रुपयांपर्यंतचा लाभ मिळणार आहे. ही योजना रिलायन्स जनरल इंशुरन्ससोबत मिळून सुरु केली आहे. ही सर्वात स्वस्त विमा पॉलिसीची योजना असून संबंधीत व्यक्ती कोविड बांधित सापडल्यास त्याला 100 टक्के विमा संरक्षण देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्टीकरण पेटीएमने दिले आहे.
कमीत कमी 3 महिने आणि जास्तीत जास्त 60 वर्ष या दरम्यानच्या नागरिकांना विमा संरक्षण सुविधा मिळणार आहे. यामध्ये 25,000 रुपयांपासून ते 2 लाख रुपयापर्यंत विमा रक्कम घेण्यासाठीचा पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध होणार असल्याचे नमूद केले आहे.