नवी दिल्लीः
जगातील सर्वात मोठी नैसर्गिक गॅससंबंधीत कंपनी पेट्रोनेट एलएनजी लिमिटेड यांनी येत्या काळात 40 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे नियोजन केले असल्याचे समजते. सदरची वरील गुंतवणूक ही पुढील 4 ते 5 वर्षाच्या काळात केली जाणार आहे. कंपनी लवकरच पेट्रोरसायन क्षेत्रातही उतरणार असल्याचे सांगितले जाते. प्रोपेन डिहायड्रोजनरेशन प्रकल्पात 12 हजार 500 कोटी रुपये गुंतवले जाणार असून याशिवाय इतरत्रही गुंतवणूक टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे.