इंधन दरवाढीचा भडका : डिझेलही एक्याऐंशी पार, वाहने चालविणे कठिण
प्रतिनिधी / बेळगाव
सरकारने इंधनावरील करात मोठी वाढ केल्यामुळे दरवाढीचा भडका उडाला आहे. पहिल्यांदाच पेट्रोलच्या किमती नव्वदीकडे वाटचाल करीत आहेत. तर डिझेलचे दरही वाढत असल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडू लागले आहे. अशीच दरवाढ सुरू राहिल्यास पेट्रोल शंभरी पार करील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे वाहनचालकांना वाहने चालविणे कठिण झाले आहे.
शुक्रवारी बेळगाव शहरात पेट्रोलचे दर प्रतिलिटर 89.18 रुपये तर डिझेल 81.10 रुपये इतके होते. मागील काही दिवसांपासून इंधनाच्या दरात दररोज वाढ होत आहे. यामुळे वाहने चालविणेही कठिण झाले आहे. पहिल्यांदाच इतकी मोठी दरवाढ झाली असून सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडू लागले आहे. आज प्रत्येकाकडे दुचाकी, चारचाकी वाहने असल्याने त्यामध्ये इंधन कसे घालायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.
दळणवळणावर होणार परिणाम
पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीचा परिणाम दळणवळणावर होत आहे. यामुळे वाहतुकीचे दरही वाढले आहेत. यामुळे सर्वच वस्तूंच्या किमतींमध्ये वाढ होताना दिसत आहे. भाजीपाला व जीवनावश्यक वस्तूही महागण्याची शक्मयता आहे. त्यामुळे सरकारने वाढविलेला कर कमी करण्याची मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.
सरकारने इंधनाच्या दरात वाढ केल्यामुळे पेट्रोल व डिझेलचे दर वाढत आहेत. ही दरवाढ अशीच राहिल्यास मोठी दरवाढ होण्याची शक्मयता आहे. पहिल्यांदाच पेट्रोलचे दर 89.18 तर डिझेलचे दर 81.10 पर्यंत पोहोचले असल्याचे त्यांनी सांगितले.
-प्रशांत मेलगे (सदस्य-पेट्रोल डिलर्स असोसिएशन)