ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पेट्रोलियम कंपन्यांनी आज पुन्हा एकदा पेट्रोलच्या दरात वाढ केली आणि डिझेलच्या किंमतीत घट केलेली दिसून आली. त्यानुसार, आज पेट्रोलच्या किंमतीत प्रति लिटर 27 ते 28 पैशांनी वाढ झाली. डिझेलच्या किंमतीत प्रति लिटर 16 ते 17 पैशांनी घट केली आहे.
दिल्ली, कोलकाता आणि आता चेन्नईमध्ये पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे. तर मुंबई, पुण्यात मागील काही दिवसांपासून पेट्रोलची किंमत 100 पार गेली आहे. मुंबईत आज पेट्रोल प्रति लिटर 107.20 रुपये तर डिझेल 97.29 रुपये इतके झाले आहे. पुण्यात आज पेट्रोलसाठी 106.82 रुपये तर डिझेलसाठी 95.44 रुपये प्रति लिटर मोजावे लागणार आहेत.
तर दिल्लीत पेट्रोल 101.19 रुपये तर डिझेल 89.72 रुपये इतके झाले आहे. चेन्नई पेट्रोल 101.92 रुपये तर डिझेल 94.24 इतके आहे. आणि कोलकातामध्ये पेट्रोल 101.35 रुपये तर डिझेल 92.81 रुपये इतके वाढले आहे.
दररोज 6 वाजता किंमती बदलतात
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.