महागाईचा भडका उडाल्याने सर्वसामान्य चिंतेत
प्रतिनिधी/ सातारा
आंतराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरवाढीचा भार ग्राहकांना सोसावा लागत आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. 99.06 रूपये लिटर पेट्रोल सोमवारी 100.05 लिटर झाले. यामुळे ऐन लॉकडाऊनमध्ये महागाईच्या भडका उडत आहे.
वाढत्या महागाईत दिवसेंदिवस भर पडत आहे. खाद्य तेल, भाजीपाला, नंतर मे महिन्यात सतत होणारी इंधन वाढीने सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आले आहे. जीवनावश्यक वस्तू इतकेच इंधन ही गरजेचे आहे. यामुळे दरवाढ होत असून यांची खरेदी करणे ग्राहकांना भाग पडत आहे. गेल्या काही दिवसापुर्वी पेट्रोल 95 रूपये लिटर आकडा पार केला. नंतर 97 रूपये लिटर ते थेट 99.40 पैसे असा दर वाढला होता. पेट्रोलची ही दरवाढ कधी थांबणार असा अंदाज लावून दरवाढ कमी होईल अशी आशा सर्वांनाच होती. मात्र सोमवारी पेट्रोलच्या दरानी शंभरी पार केली. सोमवारी पेट्रोल 100.05 लिटर होते. कोरोनाचे रूग्ण वाढु नये म्हणून मंगळवार दि. 25 मे पासून 1 जून पर्यंत कडक लॉकडाऊन लागू होणार आहे. या विकेंड लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱयांना पेट्रोल देण्याचा आदेश आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी सर्वसामान्यांनी पेट्रोल पंपावर रांगा लावल्या होत्या. दर वाढले असताना पेट्रोलच्या टाक्या फुल्ल करण्यात आल्या आहेत.
मे महिन्यांतील पेट्रोलची दरवाढ
तारीख किंमत किंमतीत वाढ
15 मे 2021 99.06 रू-0.36
16 मे 2021 99.17 रू-0.11
17 मे 2021 98.99 रू-0.18
18 मे 2021 99.83 रू-0.84