प्रतिनिधी/ रत्नागिरी
दुचाकीमधील पेट्रोल बाटलीमध्ये काढताना सिगरेटसाठी लायटर पेटवणे तरूणाच्या जीवावर बेतल़े या पेट्रोलच्या भडक्यामध्ये भाजून गंभीर जखमी झालेल्या या तरूणाचा शुक्रवारी जिल्हा शासकीय रूग्णालयात मृत्यू झाल़ा वसीम सल्लाउद्दीन पठाण (32, ऱा शेटय़ेनगर, रत्नागिरी) असे मृत झालेल्या तरूणाचे नाव आह़े
या बाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की वसीम हा 12 मार्च रोजी आपली सासूरवाडी असलेल्या कोतवडे येथे गेला होत़ा दरम्यान वसीम हा दुचाकीमधून (एमएच 08 एन 204) पेट्रोल प्लास्टिकच्या बाटलीमध्ये काढत होत़ा याचवेळी त्याला सिगारेट पिण्याची लहर आली त्यामुळे त्याने खिशातील सिगारेट काढून ती लायटरने पेटवण्याचा प्रयत्न केला. याचवेळी लायटर पेटताच बाटलीमधील पेट्रोलने काही क्षणात पेट घेतल्याने मोठा भडका उडाल़ा यामध्ये वसीम हा भाजून गंभीर जखमी झाला. नातेवाईकांनी तत्काळ उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालय येथे दाखल केल़े मात्र उपचारादरम्यान वसीम याचा मृत्यू झाल़ा या प्रकरणी त्याची पत्नी अस्फिया वसीम पठाण (30, ऱा शेटय़ेनगर) यांनी हिने रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत माहिती दिली आहे.