कर्नाटक राज्य वाहतूक व्यवसाय संघटनेचे निवेदन
प्रतिनिधी / बेळगाव
पेट्रोल व डिझेल महाग झाल्यामुळे कार व इतर वाहने चालविणे कठीण झाले आहे. या महागाईमुळे सर्व समान्य जनता मेटाकुटीला आली आहे. त्यामुळे व्यवसाय करणे अशक्मय असून वाढवलेले दर तातडीने कमी करावे, अशी मागणी कर्नाटक राज्य वाहतूक व्यवसाय संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. देशात महागाईचा भडका उडाला आहे. अशातच पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्यामुळे व्यवसाय करणे कठीण झाले आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास एक दिवस आमचा व्यवसाय ठप्प होणार आहे. तेव्हा तातडीने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली. यावेळी बसू गडकरी, नागराज पाटील यांच्यासह इतर व्यवसायिक उपस्थित होते.