नवी दिल्ली / वृत्तसंस्था
इंधनाच्या किंमती वाढल्याने पेट्रोल, डिझेलचे दर नव्या विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. तेल विपणन कंपन्यांनी बुधवारी केलेल्या वाढीनंतर पेट्रोलच्या किंमतीत प्रतिलिटर 29 ते 30 पैसे वाढ झाली आहे, तर डिझेलचे दर प्रतिलिटर 25 ते 27 पैशांनी वाढले आहेत. नव्या दरवाढीमुळे वाहनधारकांच्या खिशावर ताण पडत चालला आहे. आता मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 94.12 आणि 84.33 प्रतिलिटरपर्यंत वाढले आहेत. दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 87.60 रुपये तर डिझेल 77.73 रुपये प्रतिलिटरपर्यंत पोचले आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 88.92 रुपये प्रतिलिटर आणि डिझेल 81.31 रुपये प्रतिलिटर आणि चेन्नईत पेट्रोल 89.96 रुपये आणि डिझेल 82.90 रुपये झाले. गेल्या आठवडय़ापासून कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर ब्रेंट तेलाच्या किंमती वाढल्यानंतर इंधनाचे दर सतत वाढत आहेत. सोमवारी बेंट क्रूडने 60 डॉलर प्रतिबॅरलचा आकडा पार केला.