ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
सरकारी तेल कंपन्यांनी आज 24 दिवसांनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कपात केली आहे. आज डिझेल 17 आणि पेट्रोल 18 पैशांनी स्वस्त झाले आहे. दिल्लीत पेट्रोलची किंमत 90.99 रुपये आहे, तर डिझेलची किंमत प्रति लिटर 81.30 रुपये आहे. मुंबईत पेट्रोलची किंमत 97.40 रुपये आणि डिझेलची किंमत 88.42 रुपये प्रति लिटर आहे.
देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर दररोज सकाळी सहा वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टींची भर घातल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होत आहे. इंधनाचे दर गगनाला भिडल्याने सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे.