प्रतिनिधी/ पणजी
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रचंड वाढ केल्याच्या निषेधार्थ आज सोमवार 29 रोजी काँग्रेसतर्फे म्हापसा व मडगाव येथे निषेध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. इंधन दरात प्रचंड वाढ केल्याचा निषेध म्हणून अखिल भारतीय काँग्रेसने देशभरात निषेध मोर्चाचे आयोजन केले आहे. त्याचाच भाग म्हणून गोव्यातही आयोजन केल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. म्हपसा उपजिल्हाधिकारी आणि दक्षिण गोवा जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
मागील 23 दिवस सततपणे पेट्रोल व डिझेलचे दर वाढत आहेत. सर्वसामान्य जनतेवर सरकारने प्रचंड मोठा बोजा लादला आहे. जनहिताची सर्व तत्वे केंद्र सरकारने पायदळी तुडवली आहेत. केंद्रातील भाजप सरकार जनहित विरोधी आहे, असा आरोप चोडणकर यांनी केला आहे. प्रुड ऑईलचे दर खूप खाली आलेले असताना दरदिवशी इंधनाचे दर वाढत आहेत. मागील सहा वर्षात 18 लाख कोटी रुपये कराच्या रुपात केंद्र सरकारने जनतेच्या खिशातून काढले आहेत.
आज सोमवारी सकाळी 10 वाजता दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन होईल, तर म्हापसा येथे उपजिल्हाधिकारी कार्यालयाजवळ निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यानंतर राष्ट्रपतींसाठी जिल्हा न्यायदंडाधिकाऱयांमार्फत निवेदन सादर केले जाणार आहे. ‘स्पीक अप कॅन प्राईड हाईक’ ही सोशल मीडिया कॅम्पेन चालू होणार आहे. बस, ट्रक, मालवाहक, टॅक्सीचालक, ट्रॉलरमालक, शेतकरी, रिक्षाचालक, मोटारसायकल पायलट, पीकअप तसेच दुचाकी, चारचाकी चालकांना इंधन दरवाढीची मोठी झळ बसली आहे.
इंधनावर सर्वाधिक कर भारतात
भारत सरकारने एक जागतिक दुहेरी विक्रम केला आहे. इंधनावर सर्वाधिक कर घेणारा भारत देश आहे. सर्वाधिक कर घेणारा देश म्हणून मोदींनी देशाचे नाव पुढे आणले आहे. डिझेलवर सध्या 820 टक्के अबकारी कर आहे तर पेट्रोलवर 258 टक्के अबकारी कर आहे. जो जगात कुठेही नाही. करामध्ये देश सध्या अव्वल बनला आहे. याचे शेय मोदींना जाते. गोवा सरकारनेही गोमंतकीयांवर करांचा प्रचंड बोजा लादण्याचे काम केले आहे, अशी टीका चोडणकर यांनी केली आहे.
चीनच्या अतिक्रमणाबाबत मोदी सरकारकडून फसवणूक
चीनने ताब्यात घेमतलेल्या भारतीय प्रदेशाकडे केंद्रातील मोदी सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप चोडणकर यांनी केला आहे. भारतीय भूप्रदेशावर चीन फौजांनी कब्जा केला असल्याचा दावा करून मोदी सरकार देशाची दिशाभूल करीत आहेत. असेही चोडणकर म्हणाले. चीनी फौजानी गलवान खोरे, पॅगोंग दीएओ तळे क्षेत्र, गाज पाण्याचे झरे आणि दोऱयांग सापल क्षेत्र काबीज केले आहे. मात्र मोदीसरकार हे नाकारून चीनला सहकार्याची भूमिका घेत आहेत. आतापर्यंत चीनला सर्वात जास्त म्हणजे पाच वेळा मोदीनी पंतप्रधान म्हणून भेट दिली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना ते चारवेळा चीनला जाऊन आले. ही झुमला डिप्लोपसी असल्याची टीका चोडणकर यांनी केली. मात्र राष्ट्रहिताच्या दृष्टीने काँग्रेस याच्या पाठपुरावा सातत्याने करणार आहे. मोदी, सरकारने देशाला फसविण्याचा किती प्रयत्न करूदे मात्र काँग्रेस गप्प पहाणार नाही, असे ते म्हणाले.
चीनी कंपन्यानी पंतप्रधान केअर फंडात प्रचंड मोठय़ा देणग्या दिल्या आहेत. ही धोकादायक बाब आहे. हा निधी कुठे व कसा खर्च होणार व त्यावर कुणाचे नियंत्रण असेल हे स्पष्ट होत नाही. हा निधी सार्वजनिक कक्षेत येत नसल्याचे पंतप्रधान कार्यालयाने जाहीर केले आहे. महालेखापाल, हिशेब तपासनीस या निधीला लागत नाही. त्यामुळे हा निधी ते आपल्या मर्जीनुसार खर्च करतील असा त्याचा अर्थ होतो. या वादग्रस्त निधीत 20 मे 2020 रोजी 9678 कोटींचा निधी आला आहे. चीन भारताविरुद्ध कुरघोडय़ा करीत असताना व घुसखोरी करीत असताना चीनी कंपन्याकडून पंतप्रधान निधी स्विकारतात ही धक्कादायक बाब आहे असेही ते म्हणाले.