नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सरकारी तेल कंपन्यांनी सलग सहाव्या दिवशी रविवारी पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ केली आहे. डिझेलचे दर प्रतिलिटर 35 पैशांनी तर पेट्रोलचे दर प्रतिलिटर 30 पैशांनी महाग झाले आहे. आजच्या दरवाढीनंतर, दिल्लीमध्ये पेट्रोल 104.14 रुपये प्रतिलिटर आणि डिझेल 92.82 रुपये प्रतिलिटर दराने विकले जाते. मुंबईत पेट्रोल 110 रुपये 12 पैसे प्रतिलिटर आणि डिझेल 100 रुपये 66 पैसे प्रतिलिटर दराने विकले जात आहे.
इंधन दरवाढीचे सत्र देशात सुरुच आहे. सातत्याने होणारी दरवाढ सर्वांसाठीच डोकेदुखी ठरत आहे. खाद्य पदार्थांपासून पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या दरांमध्ये होणारी दरवाढ थांबण्याचे नावच घेत नाही. महागाईची झळ सर्वसामान्यांपर्यंत सातत्याने पोहोचत असल्याने लोकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.