नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पेट्रोलियम कंपन्यांनी पुन्हा वाढ केली आहे. मंगळवारी पेट्रोलचा दर 26 पैसे प्रतिलीटरने तर डिझेलचा दर 23 पैसे प्रतिलीटरने वाढविण्यात आला. त्यामुळे देशाच्या काही भागांमध्ये पेट्रोलची प्रतीलीटर किंमत 100 रूपयांहून अधिक झाली आहे. मुंबईत पेट्रोल 101 रूपयांकडे झुकले असून राजस्थान, हरियाणा व इतर काही राज्यांमध्येही ते 100 पार पोहचले आहे.