नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दोन दिवसांच्या अंतरानंतर मंगळवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलचा दर 25 पैसे प्रतिलीटर तर डिझेलचा दर 37 पैसे प्रतिलीटर वाढविण्यात आला. गेल्या 19 दिवसांमध्ये या दोन वस्तूंच्या दरात पंधरा वेळा वाढ करण्यात आली आहे. मात्र, देशातील पाच राज्यांनी पेट्रोलवरचा मूल्यवर्धित कर कमी करून सामान्यांना दिलासा दिला आहे. या राज्यांमध्ये आसाम (पाच रूपये कपात), पश्चिम बंगाल (1 रूपया कपात) आणि नागालँड (सव्वादोन रूपये कपात) आदी राज्यांचा समावेश आहे. आणखी काही राज्ये कपात करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.