प्रतिनिधी / शाहुवाडी
केंद्र शासनाने केलेल्या पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढी बाबत शाहुवाडी तालुका शिवसेनेच्यावतीने कोल्हापूर रत्नागिरी रोडवर मलकापूर येथे निदर्शने करून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला.
केंद्रशासनाने पेट्रोल डिझेल व गॅस दरवाढ करून सर्वसामान्य जनतेची कुंचबना केली असून अशा या केंद्र सरकारचा निषेध असो, यासाठी शाहुवाडी तालुका शिवसेनेच्यावतीने मलकापूर येथे निदर्शने करण्यात आली. यावेळी तालुका प्रमुख दत्ता पवार, उपतालुकाप्रमुख दिनकर लोहार, योगेश कुलकर्णी आदींनी मनोगत व्यक्त केले तर निदर्शन प्रसंगी मलकापूर शहर शिवसेना प्रमुख बाबुराव चांदणे, माजी नगरसेवक विनायक कुंभार ,नगरसेवक सुभाष कोळेकर, बाबुराव सोनावळे, अभिमन्यू पाटील, राहुल पोवार, पिंटू शिंत्रे, धोंडीराम सोने, नथुराम भोसले, श्री बसरे, महिला आघाडीच्या पूनम भोसले, अलका भालेकर, आदींच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
दरम्यान निदर्शन स्थळी शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी भेट दिली यावेळी पोलीस कॉन्स्टेबल दिगंबर चिले उपस्थित होते.