प्रतिनिधी / पेठ वडगाव
बहुजन समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ वडगाव शहरात त्यांच्या प्रतिमेस पंचगंगा, वारणा नदीचे जल व पंचामृत आणि दुधाने अभिषेक घालून आमदार पडळकर यांना समर्थन देण्यात आले.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून आमदार पडळकर यांचा विविध माध्यमातून निषेध करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार गोपिंचंद पडळकर यांच्या समर्थनार्थही कार्यकर्ते उतरले आहेत. पेठ वडगाव शहरात आज आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ वडगाव शहरात त्यांच्या प्रतिमेस पंचगंगा, वारणा नदीचे जल व पंचामृत आणि दुधाने अभिषेक घालून आमदार पडळकर यांना समर्थन देण्यात आले. यावेळी आमदार पडळकर यांच्या जयघोष करण्यात आला.
यावेळी मल्हार सेना जिल्हाध्यक्ष शहाजी सिद, कोल्हापूर जिल्ह्याचे युवा नेते सचिन सलगर, आण्णासो सिद, किरण पाटील, सचिन सणगर, सागर सणगर, शिवाजी पुजारी, रावसाहेब सिद, सिद्धेश रोटे, ओंकार पाटील, विनोद पाटील, शिवम वडींगेकर, प्रतिक पाटील, मनोज कोठारी, देवराज गंथडे, तुषार माळी, अविनाश जाधव, तुषार सुतार, नितीन माळकर, जगन्नाथ बंडगर, सुमित खराटे, संग्राम माने, स्वप्नील रसाळ यांचेसह कार्यकर्ते उपस्थित होते.