प्रतिनिधी / पेठ वडगाव
सध्या कोरोनामुळे व्यापारी व्यावसाईक अडचणीत आले असून व्यापारी-व्यावसाईक आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीव वडगाव नगरपरिषदेची सन २०२०-२०२१ या चालू वर्षीची चतुर्थ वार्षिक कर आकारणी पूर्वी प्रमाणे करून नवीन चतुर्थ वार्षिक कर आकारणीस मुदतवाढ मिळावी या मागणीचे निवेदन वडगाव पालिकेच्या सत्ताधारी युवक क्रांती महाआघाडीच्यावतीने नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्याधिकारी सुषमा कोल्हे यांचेकडे सादर करण्यात आले आहे
संपूर्ण भारत देशामध्ये कोरोना या संसर्गजन्य विषाणूने थैमान घातलेने कोरोना या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखणेसाठी संपूर्ण देशामध्ये दिनांक 30 जून अखेरपर्यंत संचारबंदी लागू करणेत आलेली आहे. सद्या संपूर्ण भारत देशामध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाने देशातील विविध शहरामधील आकडेवारी दिवसेदिवस वाढत असलेने, वडगांव शहरामध्ये कोरोना विषाणूच्या साथीचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून शासनाचे आदेशानुसार शहरामधील व्यापार, उद्योग, व इतर लहान मोठे व्यवसाय बंद करणेत आले होते. तर मागील वर्षी अतिवृष्टी झालेने सर्व शेतकरी व व्यापारी यांना महापुराच्या संकटाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे शहरामधील नागरीकांना व व्यापारी यांना आर्थिक संकटाचा मोठया प्रमाणात सामना करावा लागत आहे.
वडगांव नगरपरिषदेची चालू वर्षी सन २०२०-२१ मध्ये चतुर्थ वार्षीक कर आकारणी आहे. नगरपरिषदेची यावर्षी चतुर्थ वार्षीक कर आकारणी केल्यास सर्व नागरीक व व्यापारी यांचेवर आर्थिक संकट येणार आहे.. यामुळे वडगाव पालिकेच्या सत्ताधारी युवक क्रांती महाआघाडीच्यावतीने सदरची चतुर्थ कर आकारणी पुर्वी प्रमाणे आकारणी करुन नविन चतुर्थ वार्षीक कर आकारणीस कोरोना आपत्तीमुळे पुढील दोन वर्षाकरीता मुदतवाढ मिळावी या मागणीचे निवेदन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्याधिकारी सुषमा कोल्हे यांचेकडे सादर करण्यात आले आहे.
हे निवेदन युवक क्रांती महाआघाडीच्या नेत्या व नगरसेविका प्रविता सालपे, नगराध्यक्ष मोहनलाल माळी, महाआघाडीचे संघटक व नगरसेवक अजय थोरात, उपनगराध्यक्ष शरद पाटील यांचेसह युवक क्रांती महाआघाडीचे सर्व नगरसेवक यांनी सादर केले.