पेठ वडगाव/प्रतिनिधी :
भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत चार दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्यव्य केलं आहे. शेतकरी आंदोलनात चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याची अजब माहिती रावसाहेब दानवे यांनी दिली. यामुळे मंत्री रावसाहेब दानवे यांचा निषेध वडगाव शहर शिवसेनेच्या वतीने करण्यात आला. तर केंद्र शासनाच्या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेना वडगाव शहर प्रमुख व नगरसेवक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
यावेळी शिवसेना शिवसेना जिल्हा उपप्रमुख साताप्पा भवान व हातकणंगले तालुकाप्रमुख बाजीराव पाटील, वडगाव शहरप्रमुख संदीप पाटील यांनी केंद्र सरकार व मंत्री रावसाहेब दानवे यांचा निषेध व्यक्त केला. यावेळी कार्यकर्त्यांनी उठा उठा महागाई आली मोदी सरकार जाण्याची वेळ आली या घोषणा व रावसाहेब दानवे यांच्या निषेधाच्या घोषणांनी पालिका चौक दणाणून सोडला.
यावेळी शिवसेना तालुका उपप्रमुख राजू पाटील, काकासो पाटील, जितेंद्र पाटील शशिकांत पाटील, दीपक वासुदेव, सुनील चव्हाण,बबलू खाटीक, विशाल पाटील, यासीर मोमीन, सुकुमार देसाई, शिवराज मुसळे, विशाल दरेकर, बी.टी.जाधव, संताजी मुसळे, भालचंद्र कोळी, रोहन सूणगार, उमेश पाटील, प्रवीण पाटील, शकील पटवेगार, हेमलता मुसळे, अनिता बुचडे, अश्विनी पाडळकर, प्रल्हाद तालुगडे,संभाजी पाटील, बबलू यादव, धनाजी घुगरे यांच्यासह शिवसैनिक, कार्यकर्ते उपस्थित होते.