प्रतिनिधी /पेडणे
पेडणे मतदारसंघाचे भाजप पक्षाचे आमदार प्रवीण आर्लेकर यांना मंञीपद द्यावे अशी जोरदार मागणी पेडणे मतदारसंघातील भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. डॉक्टर प्रमोद सावंत यांनी प्रचारादरम्यान भर सभेत पेडणे येथे प्रवीण आर्लेकर हे पेडणे मतदारसंघातून निवडून आल्यानंतर त्यांना मंञीपद देण्याचे आश्वासन दिले होते. ते आश्वासन आता मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी पाळावे अशी जोरदार मागणी पेडणे मतदारसंघाचे भाजप कार्यकर्ते आणि प्रवीण आर्लेकर यांच्या समर्थकांनी केली आहे .
सध्या मंत्रिमंडळाचा विस्तार खातेवाटप करून करण्यात आला आहे .आणि येणाऱया काही दिवसात राहिलेली तीन मंत्रीपदे विभागून देण्यात येणार आहेत. त्या राहिलेल्या तीन मंत्रीपद आत पेडणे मतदारसंघाचे भाजप पक्षाचे आमदार प्रवीण आर्लेकर यांना स्थान देऊन चांगलं मंत्रीपद द्यावे अशी मागणी पेडण्यातील भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे. फकीरफाटो तोर्से येथे आयोजित केलेल्या खास कार्यकर्ता मेळाव्यात ही मागणी कार्यकर्त्यांनी लावून धरली.
यावेळी पेडणे भाजप मंडळ अध्यक्ष तुळशीदास गवस, पेडणे नगरपालिकेच्या नगराध्यक्ष तथा भाजप सरचिटणीस उषा नागवेकर, उपनगराध्यक्ष मनोज हरमलकर नगरसेविका अश्?विनी पालयेकर, नगरसेविका विशाखा गडेकर, नगरसेविका तृप्ती सावळ देसाई, नगरसेवक शिवराम तुकोजी, धारगळचे सरपंच भूषण नाईक, उगवे तांबोसे मोप पंचायतीचे सरपंच सरस्वती नाईक, उपसरपंच सुबोध महाले, पंच दीपक तांबोस्कर,पंच प्रसाद मृहाले तोरसे पंचायतीचे सरपंच उत्तम वीर, माजी सरपंच सूर्यकांत तोरस्कर ,बबन डिसोझा पोरस्कडे, माजी सरपंच अशोक सावळ, पंचायतीचे माजी सरपंच पद्मनाभ असोलकर, कोरागावच्या माजी सरपंच स्वाती गवंडी, पंच शोभा वारंग, पंच दिव्या नाईक, माजी सरपंच प्रार्थना मोटे, पंच सुदाम परब, युवा कार्यकर्ते कृष्णा पालयेकर ,भाजप कार्यकर्ते नरेश कोरगावकर अशोक रेडकर, महेश परब, देवानंद गावडे, जयेश पालयेकर विनिता मांदेकर देविदास नागवेकर, धारगळचे माजी सरपंच वल्लव वराडकर धारगळचे माजी जिल्हा पंचायत सदस्य तुकाराम हरमलकर, तोरसेचे माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश सावळ, चांदेल हसापूर सरपंच सतोष मळीक, विर्नोडाचे माजी सरपंच मंगलदास किनळेकर, माजी सरपंच प्रार्थना मोटे, बाबलो केणी, संतोष महाले, माजी सरपंच दशरथ महाले आदी कार्यकर्त्यांनी ही मागणी केली.
पेडणे या अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱया प्रवीण आर्लेकर याँना मंञीपद देऊन पेडणे आणि समस्त गोमंकीय आनुसूचित जातीचे प्रश्न आणि समस्या सोडविण्यासाठी मंञीपद गरजेचे असून मुख्यमंञी डॉ. प्रमोद सावंत यांनी याबाबत विशेष लक्ष घालून पेडणे मतदारसंघाला न्याय द्यावा अशी मागणी भाजप अनूसूचित जाती मोर्चा अध्यक्ष सिद्धेश पेडणेकर यांनी केली आहे.