प्रतिनिधी / पेडणे
पेडणे पालिकेच्या प्रभाग क्रमांक 4 च्या भाजप पक्षाच्या अधिकृत उमेदवार माजी नगराध्यक्षा सौ. उषा रुदेश नागवेकर यांनी आपल्या प्रभागात घरोघरी प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. रविवारी सकाळी त्यांनी माजी नगराध्यक्ष डा?.वासुदेव देशप्रभू यांना सोबत घेऊन तसेच प्रभागातील आपल्या समर्थकांना बरोबर घेऊन घरोघरी प्रचारास सुरुवात केली.
यावेळी उषा नागवेकर यांनी गेल्या पाच वर्षांच्या काळात सुमारे 1 कोटी 61 लाख रुपये निधी खर्च करुन सरकारच्या विविध खात्यामार्फ केलेला कामपूर्ती जाहिरनामा आणि वचननामा वितरीत केला.
सौ. उषा नागवेकर यांनी गेल्या पाच वर्षात आपल्या प्रभागात केलेली विविध विकास कामामुळे त्यांचा विजय प्रभाग 4 मध्ये निश्चित असल्याचे डा?.वासुदेव देशप्रभू यांनी यावेळी बोलताना सांगितले . उषा नागवेकर यांना प्रभागातील मतदार त्यांनी केलेल्या विकासकामाची पोचपावती ही भरघोस मते देऊन करतील असे डा?क्टर वासुदेव देशप्रभू यांनी सांगितले .
आपल्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये मतदारांचा आपणास वाढता उत्स्फूर्त पाठिंब असून आपण गेल्या पाच वर्षात सरकारच्या सार्वजनिक बांधकाम रस्ते विभाग खाते, जलसिंचन खाते आदी विविध खात्यातर्फे वाडय़ा – वाडय़ावर विकास कामे केली. तसेच गेली अनेक वर्षे काही वाडय़ावर रस्ते झाले नव्हते ते काम पूर्ण केले. आरोग्य शिबिर, वनमहोत्सव कार्यक्रम घेतले. तसेच अनेक गरजू व्यक्तींना मदतीचा हात दिला. केविड काळात जे काम केले आणि विविध विकासकामे गेल्या पाच वर्षांत केली ती माझ्या विजयासाठी पुरेशी असून मतदारांचा लाभत असलेला उत्स्फूर्त पाठिंबा यामुळे आपला विजय 100ज्ञ् निश्चित असल्याचे उमेदवार उषा नागवेकर यांनी सांगितले .